Consumer Redressal

Consumer complaints & judgements portal
Tours & Travels Active

Complaint #12333 — Narayan S Dabholkar

Filed: 23 Apr 2015  ·  Address: Ghatkopar (E), Mumbai - 400075
माझ्या आजीच्या कार्यासाठी मला कुडाळ ह्या ठिकाणी जायचे होते. त्यामुळे मी poulo travels ह्या कंपनी कडून तिकीट बुक केले होते. मी १७ एप्रिल २०१५ रोजीचे तिकीट बुक केले होते. बस कुडाळला १८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता पोहचण्याची गरज होती. परंतु बस दुपारी १२.३० वाजता कुडाळ येथे पोहचली. त्याला कारणही तसेच होते कंपनीने भंगार अवस्थेत असलेली बस प्रवासासाठी काढून. प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. प्रथम मुंबई - पुणे महामार्गावर बसचा टायर फुटला. नंतर पुण्या मध्ये बसचा वॉल लिक झाला त्यामुळे गिअर पडत न्हवता. तेव्हा आम्ही बस चालकाकडे बस बदलण्याची मागणी केली. त्याला बस चालकाने योग्य असा प्रतिसाद दिला. आणि व्यवस्थापकांना फोन केला. परंतु poulo travels व्यवस्थापकांनी तीच बस रिपेअर करून चालवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जीव मुठीत घेवून प्रवास करण्याची वेळ आमच्यावर आली. आणि आम्हाला कुडाळ येथे पोहोचण्यासाठी अत्यंत उशीर झाला. ह्यात चालकाची काहीही चुकी नाहीये. सर्व चूक poulo travels व्यवस्थापनाची आहे. ही तक्रार करण्याचे कारण इतकेच कि आमच्यावर जी वेळ आली ती इतर कोणावर ही येवू नये.

‹ More Tours & Travels complaints File your own complaint